logo

मोफत आधार अपडेटची ची मुदत पुन्‍हा वाढवली

मोफत आधार अपडेटची ची मुदत पुन्‍हा वाढवली

महाराष्ट्र – तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचे असेल तर सरकारने तुमच्‍यासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्‍यासाठी सरकारने यापूर्वी 14 मार्च ही तारिख निश्‍चित केली हेती. आता याची मुदत पुन्‍हा एकदा वाढवली आहे. जाणून घेऊया आधार मुदतवाढीची तारीख आणि अपडेट कसे करावे याबाबत…

आता आधार पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजेच आता 14 जून 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येईल.



‘ही’ कागदपत्रे आवश्यक

आधार अपडेटसाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल.

पहिले ओळखपत्र आणि दुसरा वास्‍तव्‍यास असणारा पत्ता पुरावा म्‍हणून. .

आधार अपडेटसाठी आधार केंद्रावर सहसा 50 रुपये शुल्क आकारले जाते, परंतु UIDAI नुसार, ही सेवा 14 जून 2024 पर्यंत मोफत आहे. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही मतदार कार्ड देऊ शकता.

घरी बसल्‍या असे करा आधार कार्ड अपडेट-


मोबाइल, पीसी किंवा लॅपटॉपवरून सर्वप्रथम UIDAI वेबसाइटवर जा. यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा. येथे आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा. यानंतर डॉक्युमेंट अपडेट वर क्लिक करा आणि व्हेरिफाय करा. आता खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्ता पुरावा अपलोड करा. यानंतर सबमिट वर क्लिक करा. तुम्हाला एक विनंती क्रमांक मिळेल आणि फॉर्म सबमिट केला जाईल. तुम्ही विनंती क्रमांकावरून अपडेटची स्थिती देखील तपासू शकता. काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल.

3
691 views